जामखेड न्युज – – – –
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने कोणतेही नोटीस न देता अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ खर्डा चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी म्हणाले मंत्री नवाब मलिक मुस्लिम समाजाचे नव्हे तर महाराष्ट्राचे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व किरीट सोमय्या यांनी कटकारस्थान करून खोटे आरोप लावून वीस वर्षापूर्वीच्या जमीन व्यवहार बेकायदेशीर ठरवून अटक केली आहे. जोपर्यंत नवाब मलिक बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ न बसता सातत्याने आंदोलन करण्याचा इशारा कोठारी यांनी दिला. भाजपचे राजकारण ब्रिटीशाला लाजवेल असे खुनशी असून मंत्र्यांना अटक करून राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, ऊमर कुरेशी यांनी या घटनेचा निषेध करून भाजपच्या खुनशी राजकारणावर टिका केली. यावेळी प्रकाश काळे ईस्माईल सय्यद , फिरोज बागवान, दादासाहेब रिटे, हरीभाऊ आजबे, अमोल गिरमे, कुंडल राळेभात, अमित जाधव, राहूल अहीरे, प्रदीप शेटे, वसीम सय्यद, दत्ता पवार, , झुबेर शेख, ओमसिंग भैसाडे, वसीम शेख आदी उपस्थित होते.