जामखेड न्युज – – –
साध्या पद्धतीने राहणाऱ्या संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीमधून समाजसेवा काय असते, वैज्ञानिक दृष्टीकोन काय असतो, अंधश्रद्धेने कसे नुकसान होते याबाबत जीवनभर जनजागृती केली. संत गाडगे बाबा यांनी केलेल्या कार्यामधून प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनीच त्यांचे विचार आत्मसात करणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणे सध्याच्या काळात गरजेचे आहे याच दृष्टीकोनातून श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे संत गाडगेबाबा यांची १४६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, जाहेद बागवान, सुलभा लवुळ, विजयकुमार हराळे, अतुल दळवी, आश्रू सरोदे, कृष्णा मोहिते, माऊली मोहिते, अनिकेत घोलप, शिवरत्न वराट, नितीन नेमाने, महारुद्र कडभने यांच्या सह अनेकजण हजर होते.
संत गाडगेबाबा यांचे विचार आजच्या समाजासाठी खुपच उपयोगी आहेत. प्रत्येकाने त्यांच्या विचारांचे अनुकरण केले तर आदर्श समाजनिर्मिती होईल असेही सांगितले.