जामखेड न्युज – – – –
बीड जिल्ह्य़ातील केज येथील समर्थ नगर भागात राहत असलेले शकील बशीर तांबोळी हे पुणे येथे एका कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 वा 8921058445 या अनोळखी नंबर वरुन एक फोन आला. त्याने सांगीतले की, तुमची केवायसी सेवा चालू ठेवण्यासाठी प्ले स्टोअर्स मधून एक अॅप डाउनलोड करा. नंतर 10 रु.चे रिचार्ज करा असे
सांगितले. त्या नंतर प्रा. शकील बशीर तांबोळी यांच्या बँक खात्यातून एकदा 25 हजार, दुसऱ्यांदा 49 हजार 350 आणि तिसऱ्या वेळी 65 हजार रु. असे एकूण 1 लाख 39 हजार 365 रु.ची फसवणूक झाली आहे. फी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, प्रा. शकील बशीर तांबोळी यांनी दि. 21 फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध भा.दं.वि. 420 आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 (क) नुसार
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत








