Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या अधिकारी टेंडर स्वीकारत नव्हते; कंत्राटदाराने अनोखी शक्कल घरी गेलेले कर्मचारी पळत कार्यालयात...

अधिकारी टेंडर स्वीकारत नव्हते; कंत्राटदाराने अनोखी शक्कल घरी गेलेले कर्मचारी पळत कार्यालयात आले

0
240
जामखेड न्युज – – – – 
सार्वजनिक बांधकाम विभागातील गोंधळ हा काही नवीन नाहीये. असाच काहीसा गोंधळ औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सोमवारी पाहायला मिळाला. कंत्राटदाराची निविदा घेण्यास नकार देताच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर काही वेळात त्यांची निविदा स्वीकारण्यात आली. मात्र या घटनेने कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता.
औरंगाबाद: सार्वजनिक बांधकाम विभागातील गोंधळ हा काही नवीन नाहीये. असाच काहीसा गोंधळ औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सोमवारी पाहायला मिळाला. कंत्राटदाराची निविदा घेण्यास नकार देताच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर काही वेळात त्यांची निविदा स्वीकारण्यात आली. मात्र या घटनेने कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता.
अधिक माहिती अशी की,घनसावंगी तालुक्यातील रांजणी ते कुंभार पिंपळगाव ते राजा टाकळी (राज्य महामार्ग क्र. २२२) या रस्त्याच्या २०० कोटींतून दुपदरीकरण व मजबुतीकरणाच्या कामासाठी ऑनलाईन व ऑफलाईन निविदा भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे नाशिकच्या जे. एम. म्हात्रे आणि एस. ए. सावंत फर्मकडून पाटील हे ऑफलाईन तांत्रिक निविदा सादर करण्यासाठी बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता कार्यालयात सकाळी आले होते. आवक-जावक विभागाकडे त्यांनी विनवणी केली. मात्र निविदा स्वीकारण्यास कार्यालयातील लिपिक यांनी नकार दिला. तर कार्यालयाला कुलुप लावून कर्मचारी निघून गेले.
निविदा सादर करण्याची मुदत सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. त्यामुळे हतबल झालेल्या पाटील यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनातच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करतो म्हणून गोंधळ घालायला सुरवात केली. मग काय कार्यालयाला कुलूप लावून घरी गेलेले कर्मचारी पुन्हा पळत कार्यालयात आले आणि पाटील यांची निविदा दाखल करून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!