जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
मुलींसाठी दागिन्यांऐवजी शिक्षण महत्त्वाचे आहे जर मुलींच्या शिक्षणावर योग्य खर्च केला तर भविष्यात मुली आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करतील तसेच स्वतःच्या पायावर उभ्या राहुन लग्ना आगोदर आई वडिल व नंतर सासू सासरे यांची सेवा करेल नवऱ्यापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही उलट नवर्याला मदत करता येईल असे मत शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिपाली भोसले सय्यद यांनी व्यक्त केले.
जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये प्रथमच महिलांनी अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार तर प्रमुख पाहुण्या म्हणून सिनेतारका व शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद होत्या
छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून गणेश आरती व शस्त्र पुजन करत लाठी काठी महिला शस्त्र पथक दांडपट्टा व तलवार रोप मल्लखांब शिवचरित्रावर आधारित नृत्य करत मुलींच्या मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिक करत मिरवणूक संविधान चौकात येऊन त्या ठिकाणी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
यावेळी सौ. मीना अविनाश बेलेकर सौ. राधिका अमोल फुटाणे ज्योती गणेश राऊत सौ. आरती सुरज काळे सौ. शितल गणेश काळे सौ. रासकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन दिपाली भोसले सोनाली भोसले
यांनी केले
यावेळी बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, आज खुपच छान रॅली झाली मला वेळेमुळे सहभागी होता आले नाही खुपच छान वाटले मी २०१४ पासून दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलांसाठी काम करत आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे हा उद्देश आहे. मुलींच्या शिक्षणावर खर्च केल्यास भविष्यात मुली डॉक्टर, इंजिनिअर, वकिल, न्यायाधीश, आर्किटेक्चर होऊ शकतात.
यावेळी परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
कोविड योद्धा शोभा ताई आरोळे संचालिका सीआरएचपी
ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड
ज्योतीताई बेल्हेकर
महिला व बालकल्याण अधिकारी जामखेड
कु शिवानी विष्णुपंत पन्हाळकर
एमडी अनेस्थेशिया
आरोग्य सेविका म्हणून
अलका बेलेकर, शारदा संजय बेलेकर (आरोग्य सेविका)
उषा अशोक राळेभात (मदतनिस सेविका)
उर्मिला लक्ष्मण खेत्रे मदतनीस सेविका
सुरेखा अनिल सदाफुले( अंगणवाडी सेविका)
सुमन विश्वंभर जगदाले (अंगनवाडी सेविका)
जयश्री पृकाश जगदा(मदतनिस सेविका)
सुनिता विषणू केवडे(अंगनवाडी सेविका
अल्का रमेश ससाने (स्वछता दूत) छबाबाई पांडुरंग कांबळे (स्वछता दूत) मंदा किसान मोरे शालन बाप्पू डाडर, सारिका अजय गौड आशा वर्कर सपना विजय गौड अंगणवाडीसेविका, पुष्पा विजय बेलेकर अंगणवाडी सेविका अर्चना दत्ता केवड़े, अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी बचत गट, आशा वर्कर स्वाती सचिन भदर्गे, सविता अनिल वीर, सुरेखा अशोक वीर, साक्षी रामचंद्र भोसले (बॉक्सिंग अँड कुस्ती) दीक्षा शाम पंडित राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन, वैष्णवी महादेव पवार (राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता वूशो कराटे)
दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून भगवे फेटे परिधान करून भव्य दिव्य अशी डोळ्याचे पारणे फेडणारी मिरवणूक निघाली यात पालखी, राजमाता जिजाऊच्या वेषात घोड्यावर बसलेली महिला, मुलींचे मर्दानी खेळ सादर करण्यात आले यात मोठय़ा संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता. जामखेडच्या इतिहासात प्रथमच महिलांनी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात भव्य दिव्य मिरवणूक व परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.