जामखेड न्युज – – –
अहमदनगरमधून (Ahmednagar) तोतया कमांडोला (Fake commando) अटक करण्यात आली आहे. या तोतया कमांडोनं सैन्यदलात नोकरी लावून देतो असं तरुणांना आमिष दाखवलं होतं. इतकंच नाही तर त्यानं या तरुणांकडून लाखो रुपये ही उकळले आहेत. पोलिसांनी आता या तोतया कमांडोच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सैन्यदलात नोकरी लावून देतो असं आमिष देऊन आठ तरुणांना लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया कमांडर नवनाथ गुलदगड याला पोलिसांनी अटक केली आहे.
सैन्य दलात नोकरी लावून देण्याचंआमिष दाखवून तरुणांची आठ लाखांला फसवणूक करणाऱ्या तोतया कमांडरला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून युनिफॉर्म बनावट नियुक्तीपत्रे पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी नवनाथ गुलदगड हा कमांडो असल्याचं सांगून त्याच्याकडे असलेल्या स्कॉर्पिओवर कमांडो असे लिहीत होता. संगमनेर राहुरी राहता अकोला या भागात काही तरुणांना सैन्यभरती करतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करत होता. त्याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी राहुरी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडं बनावत ओळखपत्र युनिफॉर्म तसंच युनिफॉर्मवर असलेल्या चिन्हं नेमप्लेट, छापील बनावट नियुक्तीपत्र आधार कार्ड पॅन कार्ड पोलिसांनी जप्त केलं आहे.