जामखेड न्युज – – –
महारष्ट्र राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचारी व
शिक्षक संघटना समन्वय समितीच्या दि. २३/०१/२०२२ रोजी झालेल्या सभेतील निर्णयानुसार महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ने २३ व २४ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यव्यापी संपात आमच्या पुढील मागण्यांसाठी आम्ही अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या आदेशान्वये राज्यव्यापी संपात आम्ही सहभागी होणार आहोत. आम्ही विनंती करतो आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून मागण्या मान्य होणेबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी ही विनंती. माध्यमिक शिक्षक संघाने निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षक संघाने खालील मागण्या केल्या आहेत.
१) नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन
योजना लागू करा. तसेच मध्यंतरीच्या काळात केंद्रीय
(NPS) कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सर्व सुविधा तत्काळ
राज्यात लागू करा.
२) किमान पेन्शन मध्ये केंद्रासमान उचित वाढ करा
३) बक्षी समिती अहवाल – दुसरा खंड प्रसिद्ध करा.
४) मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक | माध्यमिक व उच्च
माध्यमिक शाळांमधील कोविड १९ संक्रमित दिवंगत
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय
आर्थिक लाभ व अनुकंपा योजनेखाली कायम नोकरी
देण्यात यावी. तसेच जे दिवंगत शिक्षक शिक्षकेतर
(NPS)धारक असतील त्यांच्या वारसांना नियमानुसार
सानुग्रह अनुदान / आर्थिक सहाय्य द्यावे.
५) अनुदानासाठी अघोषित शाळा/तुकड्या यांना त्वरित
अनुदान मंजूर करण्यात यावे. यासाठी आर्थिक तरतूद
करण्यात यावी.
६) दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेल्या संच मान्यता त्वरित
दुरुस्त करून मिळाव्यात.
७) वैद्यकीय प्रतिपूर्ती, थकीत वेतन बिले तसेच सातव्या
वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता यासाठी निधी
उपलब्ध करून द्यावा.
८) अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा तसेच
कोरोना काळात वयाधिक झालेल्या कर्मचाऱ्यांना विहीत
वय मर्यादेत सूट द्या.
९) केंद्राप्रमाणे सर्व भत्ते द्या.
१०)संस्थेत वाद असलेल्या ठिकाणी सेवा जेष्ठतेनुसार
मुख्याध्यापक नियुक्तीचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना
द्यावेत व अशा संस्थावर प्रशासक नियुक्त करावेत.
११)संच मान्यतेत कला व क्रीडा शिक्षकांची पदे स्वतंत्रपणे
मंजूर करून व कार्यभारानुसार त्यांच्या नियुक्त्या
कराव्यात.
१२)सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला
पूर्वीप्रमाणे शासन सेवेत नियुक्ती द्या.
१३)शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळणाऱ्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, चिकुन गुनिया व
पोस्ट कोविड आजारांचा समावेश वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या
आजारांच्या यादी कराव्या.
१४)प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल पदासाठी विद्यार्थी
संख्येची अट शिथिल करावी.
१५)शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० वर्षाच्या
सेवेनंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ
देण्यात यावेत.
१६)शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांना बी.एल.ओ.तसेच इतर अशैक्षणिक कामे देऊ नयेत.
१७)नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे.
अशा विविध मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षक संघ दोन दिवसाचा संप करत आहे.