वक्फबोर्ड जमिन घोटाळ्यात मोठी कारवाई – तत्कालीन नायब तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यास अटक

0
517
जामखेड न्युज – – – – 
 तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाच्या गैरव्यवहार प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आणखी एका बड्या अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकाऱ्याला पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे,मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगणवाड अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत.
चिंचपूर येथील वक्फ बोर्डाच्या जमिन घोटाळ्या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची एसआयटी तपासणी करत आहे. आष्टी पोलिसांनी तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे,मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगणवाड या दोघांना आज पहाटे २:३० वाजेच्या सुमारास अटक केली. या दोघांची काही दिवसांपूर्वी एसआयटीने चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. आज दुपारी २ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यापूर्वी चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहब यांच्या २२ हेक्टर ४९ गुंठे जमीन घोटाळ्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळकेला अटक केल्यावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवस्थान आणि वक्फ जमिनीच्या घोटाळ्यातील प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुरनं.२०५/२०२१ कलम १०९, ४०९, ४२०,४६७, ४६८,१२० ब, ३४ भा दं वि. सह कलम ५२ अ वक्फ अधिनियम १९५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here