जामखेड न्युज – – – –
बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं बुधवारी सकाळी निधन झालं आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये झाला होता. बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अंगावर घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळेही बप्पी लहरी यांची क्रेझ होती.
बप्पी लहरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली. रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती. शरीरावर प्रचंड सोनं, गळ्यात चेन, हातात अंगठ्या अशी त्यांची प्रतिमा होती. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून त्यांना अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत बप्पी लहरी यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
संगीतसह बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध म्युझिक कम्पोझर, सिंगर बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये बप्पी लहरी यांनी अखेरचा श्वास घेतला. PTI या वृत्तसंस्थेनुसार, बप्पी लहरी यांनी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. पीटीआयने डॉक्टरांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
बप्पी लहरी यांचे निधन ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे (Obstructive Sleep Apnea) झाले. बप्पी लहरी यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. ते अनेक व्याधींनी देखील त्रस्त होते. त्यांच्या एका निकटवर्तीने सांगितले कि, जवळपास एक महिन्यांनंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मुंबईतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बप्पी लहरी यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक नामजोशी यांनी दिली आहे.
बप्पी लहिरी यांनाही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.