जामखेड न्युज – – – –
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 283 जयंती जामखेड येथील बंजारा बांधवांनी एकत्र येऊन मोहा फाटा जामखेड येथील बाल निवारागृह या अनाथ मुलांच्या बरोबर साजरी केली…
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष आणि शिक्षणाप्रती अफाट प्रेम असलेले गटविकास अधिकारी मा.श्री.प्रकाशजी पोळ उपस्थित होते. यावेळी सेवालाल महाराज जयंती निमित्त निवारा गृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. श्री. प्रकाशजी पोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
ADVERTISEMENT

अध्यक्षीय भाषणामध्ये मा.श्री. प्रकाशजी पोळ यांनीसंत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली तसेच संत सेवालाल महाराजांची तत्वे कोणती होती याविषयी पण सखोल पणे माहिती सांगितली त्याचबरोबर शिक्षणाविषयी उपस्थित सर्व मुलांना सखोल असे मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राहुल चव्हाण यांनी केले.संत श्री सेवालाल महाराजांच्या जीवन चरित्र विषयी श्री राजेश्वर पवार यांनी. सखोल माहिती दिली.आभार श्री किशोर राठोड यांनी मानले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री बळीराम जाधव, राहुल चव्हाण, प्रकाश चव्हाण, बालाजी चव्हाण, राजन पवार, राजेश्वर पवार, विष्णू राठोड, प्रकाश राठोड, किशोर राठोड , किरण पवार, विलास पवार , विठ्ठल पवार ,रवि राठोड सह सर्व बंजारा बांधवानी प्रयत्न केले.
यावेळी या कार्यक्रमाला आमचे मित्र श्री.ज्ञानेश्वर कोळेकर ,विजय जाधव,खंडेराव सोळंके,लक्ष्मीकांत ईडलवार, खटावकर उपस्थित होते.