ऑन दि स्पॉट काम करणारे कार्यसम्राट आमदार बाळासाहेब (काका) आजबे – महादेव महाजन

0
211
जामखेड न्युज – – – – 
 मतदार संघातील प्रत्येक गावातील अडीअडचणी गावात भेटी देऊन मार्गी लावण्याचा उपक्रम मतदार संघाचे आमदार बाळासाहेब (काका) आजबे  यांनी सुरु केलेला असुन मतदार संघातील दौरा भेटी दरम्यान पाटोदा येथे जात असताना चिंचपुर येथे ग्रामस्थांच्या विनंतीवरुन थांबले असता  गावकर्यां तर्फे महादेव महाजन यांनी मारुती सभामंडप बाबत चर्चा केली व लगेच आमदार साहेबांनी सभामंडप साठी दहा लाख रुपये दोन टप्यात मंजुर केले  त्याच बरोबर   स्मशानभुमीसाठी पाच लाख व अन्य दोन वस्ती रस्ते मंजुर केले. त्यामुळे स्वतः आमदार गावात येऊन गावाचे प्रश्न सोडवित असल्याने नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे .
यावेळी चिंचपुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आष्टी मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार बाळासाहेब (काका) आजबे हे गावातील नागरीकांच्या समस्या ऐकून घेत त्या समस्या जाग्यावरच सोडविण्यासाठी प्रधान्य देत असल्याने गावातील असलेल्या अडचणी लगेच संबंधीत अधिका – यांना सुचना देऊन मार्गी लावून निर्णय ” ऑन दि स्पॉट ” ही मोहिम आ . आजबे यांनी राबवली असल्याने नागरीक समाधानी असल्याचे माजी सरपंच महादेव शेठ महाजन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले .
यावेळी महादेव महाजन माजी सरपंच हरिदास सातपुते लोखंडे साहेब शिवाजी घोडके गोंदवले साहेब राजू बांगर सय्यद गुलाब भाई शेख वजीर रवींद्र टेकाळे गळगटे फौजी बाळासाहेब लोखंडे पोपट सातपुते मच्छिंद्र सातपुते संभाजी टेकाळे, सरपंच रंगनाथ गाडे  वैजनाथ टेकाळे महादेव सातपुते कल्याण सातपुते संभाजी सातपुते युवा नेते दादासाहेब ढवळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here