जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज दिमाखदार सोहळ्याने अनावरण करण्यात येत आहे. याच प्रेरणादायी सोहळ्याचे निमित्ताने जामखेड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी ‘सावित्री महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी भूषविले. प्रमुख व्याख्याते इंग्रजी विभागप्रमुख डॉ. शत्रुघ्न कदम यांनी याप्रसंगी ” सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. “इतिहासातून धडा घेऊन फुले दांपत्याने सुरु केलेला शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा लढा नव्या पिढीला दिशा देणारा आहे. विद्यापीठ परिसरातील सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा हे संघर्षाचे स्मारक बनून सर्वांना प्रेरित करत राहिल. आजपासून खऱ्या अर्थाने विद्यापीठाचे ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ हे नाव सार्वाथाने सार्थ ठरणार आहे.” असे मत डॉ. कदम यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT 

जामखेड महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.मस्के गौरव, एन.एस.एस.विभाग प्रमुख प्रा. अविनाश फलके, डॉ. सुपेकर, डॉ. म्हस्के, डॉ. गाडेकर, प्रा. श्रीमती साबळे मँडम सर्व विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारीआणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तुकाराम घोगरदरे यांनी केले व एन.सी.सी. प्रमुख डॉ.केळकर जी.डी यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले आणि अध्यक्षांच्या अनुमतीने कार्यक्रमाचा समारोप झाला.









