जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण असलेल्या शिवपट्टन (खर्डा) किल्ला परिसरात पुरातत्व विभागातर्फे किल्ला दुरूस्तीचे काम सुरू आसताना खोदकाम करताना सुमारे २५० तोफगोळे व तोफेचा तुटलेला भाग आढळून आल्याने ते पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. हे तोफगोळे शिवकालीन आहेत असे इतिहास संशोधकांनी सांगितले

( खर्डा) शिवपट्टन परिसरात १७९५ मध्ये मराठे व निजाम यांच्यात घनघोर लढाई झाली होती या लढाईत मराठ्यांनी निजामशाही पराभुत करुन विजय प्रात केला होता. आजही खर्डा भागात अनेक ठिकाणी युध्दाच्या खुणा सापडत आहेत. रणटेकडी दौंडवाडी येथुन युध्दाची तयारी आखली जात होती तेथे ही टेकडी रणागणाची साक्ष देत उभी आहे. अनेक शेतकरी बांधवांना देखील नागंरताना तोफ गोळे, ढाल, तलवारी मिळुन आलेल्या आहेत. ही लढाई पाणीपत मधील दारूण पराभवानंतर शिवपट्टन खर्डा येथिल मराठ्यांचा विजय
विजयाची शौर्याची गाथा ठरला आहे. आजही अनेक खर्डा शहराच्या जवळपास पुरातन वास्तु इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.

पुरातत्त्व विभागातर्फे किल्ला दुरूस्तीचे काम सुरू आहे. खोदकाम सुरू आसताना या ठिकाणी सुमारे २५० तोफगोळे सापडले. इतिहास संशोधक प्रा. जवळेकर यांनी पाहणी केली व हे शिवकालीन तोफगोळे असल्याचे त्यांनी सांगितले. हि बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली ते पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
शिवप्रेमीची मागणी
किल्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे व लवकरात लवकर व्हावे तसेच जे काही पुरातन वास्तु मिळतील ते जपून ठेवुन पर्यटाकासाठी किल्याच्या आवरातच पुन्हा मांडाव्यात ही मागणी आहे. तसेच पावणेचार कोटीचा निधी योग्य ठिकाणी योग्य जागी वापरण्यात यावा व किल्याच्या वैभवात भर पडेल असे काम पुरातत्व विभाग तसेच ठेकेदारने जातीने लक्ष घालुन करावे अन्याथा चुकीच्या कामाला श्री शिवप्रतिष्ठानचा विरोध कायम राहिल अशा इशारा शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष पाडुंरंग भोसले यांनी दिला आहे .