जामखेड बेमुदत बंदची हाक मागे, साखळी उपोषण मात्र सुरूच
खासदार निलेश लंके उद्यापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर करणार अमरण उपोषण?
राष्ट्रीय महामार्ग कामाची अनियमितता व अतिक्रमणे याबाबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपोषण सुरु केले आहे. आज जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आज खासदार निलेश लंके यांनी उपोषण स्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला व उद्या जर दहा वाजेपर्यंत हद्द निश्चित करण्यासाठी अधिकारी आले नाहीत तर पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर खासदार अमरण उपोषणाला बसणार आहेत असे जाहीर केले. तसेच उद्या जामखेड चा बाजार असल्याने गैरसोय नको म्हणून जामखेड बंद मागे घेण्यात आला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, जामखेड शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी अवधूत पवार सह सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. आज जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. आज व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला उद्या बाजार असल्याने सर्वाचे हित पाहता जामखेड बेमुदत बंद मागे घेत साखळी उपोषण सुरूच राहणार असे जाहीर केले. तसेच जामखेड च्या सर्व पक्षीय एकजुटीचा राज्याचे आदर्श घ्यावा असेही लंके यांनी सांगितले. तसेच उद्या दहा वाजेपर्यंत जर हद्द निश्चिती साठी अधिकारी आले नाहीत तर अकरा वाजेपासून पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी खासदार निलेश लंके, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, शहाजी राळेभात, अमित चिंतामणी, लक्ष्मण ढेपे, प्रशांत राळेभात, प्रा. विकी घायतडक, अँड हर्षल डोके, राहुल उगले, मंगेश आजबे, राजेंद्र गोरे, अनिल सदाफुले, दत्ता डिसले, प्रदिप टाफरे, पवन राळेभात, सुनिल जगताप, सुरेश भोसले, बाबा चंदन, प्रा. शहाजी डोके, कैलास हजारे, कुंडल राळेभात, रंगनाथ राळेभात, अमोल गिरमे, वसिम सय्यद, सुनिल उगले, बजरंग डुचे, संदीप (आण्णा) गायकवाड यांच्या सह सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, नगरपरिषद, पोलीस प्रशासन व ठेकेदार यांनी पाच तारखेपासून हद्द निश्चितीच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी दिले होते तेव्हा चा जामखेड बंद मागे घेऊन साखळी उपोषण सुरु केले होते. या साखळी उपोषणाला मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार निलेश लंके, नगर सकल मराठा समाजाचे नेते यांनी भेटी देत पाठिंबा दर्शवला आहे. तसेच सभापती प्रा राम शिंदे यांनी नियमानुसार अतिक्रमणे हटवली जातील असे सांगितले होते तरीही आता अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. यामुळे सर्व पक्षीय व संघटनांच्या वतीने आजपासून जामखेड कडकडीत बंद करण्यात आले होते शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवत अतिक्रमण हटाव साठी पाठिंबा दिला होता मात्र उद्या बाजार असल्याने गैरसोय नको म्हणून उद्या चा बंद मागे घेण्यात आला आहे मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर सुजित चेमटे यांनी दि. ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दि. २६ फेब्रुवारी रोजीचा जामखेड बंद मागे घेतल्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार अतिक्रमण काढण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया न केल्याने मागे घेतलेले जामखेड बंदचे आंदोलन पुन्हा पुकारले असून राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुजित चेमटे व संबधीत वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत हद्द निश्चित करत नाहीत तोपर्यंत आजपासून सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने बेमुदत बंद पुकारात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते त्यानुसार बंद करण्यात आला होता. पण उद्या आठवडे बाजार असल्याने लोकांची गैरसोय नको म्हणून उदयाचा बंद मागे घेण्यात आला तसेच साखळी उपोषण सुरूच राहणार आहे असे जाहीर करण्यात आले.
गेली साडेतीन वर्षांपासून जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. ते अनेक अडथळे व कासव गतीने सुरू आहे. यामुळे अनेक छोटे मोठे अपघातही झाले आहेत. यामधे अनेक जण जायबंदी तर काहींना आपले जीव गमवावे लागले आहेत. हे काम सुरू असताना अनेक अडचणींबरोबरच अतिक्रमण काढणे हा मोठा अडथळा ठरत आहे. यासाठी विविध पक्षसंघटनांकडून अनेक आंदोलने तर प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका. तसेच जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेटू देऊन अतिक्रमण काढण्याच्या सुचना करूनही काहीच होत नसल्याने अखेर जामखेडकरांनी अखेर सर्वपक्षीय व बेमुदत जामखेड बंदचे हत्यार उपसले होते.
त्याच अनुषंगाने जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८डी मार्गावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांनी काही दिवसापूर्वी पुकारलेला बेमुदत बंद स्थगित करण्यात आला होता. मात्र सर्व पक्षीय साखळी उपोषण सुरू राहणार ठेवण्यात आले होते.
त्याच पार्श्वभूमीवर आज दि. ५ मार्च रोजी निर्धारित मुदतीत हद्द निश्चित न झाल्याने उदया शुक्रवार दि.६ मार्च पासून सर्व पक्षीय व सामाजिक संघटनानी जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८- डी मार्गात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणा मुळे जामखेड शहर बेमुदत बंद पुकारला आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील बहुतेक दुकाने बंद होती. आज खासदार निलेश लंके यांनी उपोषण स्थळी भेट देत. सर्व अधिकारी यांना फोन करून उद्या दहा वाजेपर्यंत हद्द निश्चिती काम करा अन्यथा पुणे येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले.