जामखेड तालुक्यातील वाकी व साकत वगळता ४७ सरपंचांच्या निवडीचा कार्यक्रम नऊ व दहा रोजी पार पडणार

0
249
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. प्रशासनाने सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर केले आहे. सरपंचव उपसरपंच पदाची निवडणुक कार्यक्रम कधी
जाहिर होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या
होत्या. 09 व 10 फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील सरपंचपदाची निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. वाकी ग्रामपंचायत व साकत मधील एका जागेसाठी वादंग निर्माण झाल्याने या दोन ग्रामपंचायतमध्ये सरपंच निवडी होणार नाहीत बाकी ४७ सरपंचांच्या निवडी पार पडतील.
    नऊ फेब्रुवारी रोजी २४ तर दहा फेब्रुवारी रोजी २३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणुका होतील
बिनविरोध झालेल्या वाकी व साकत मधील एका जागेचे वादंग झाल्याने या ठिकाणी सदस्य पदांसाठी १६ ते २३ फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणे, २४ फेब्रुवारी रोजी छाननी, २६ फेब्रुवारी अर्ज मागे घेणे याच दिवशी दुपारी तीन नंतर चिन्ह वाटप व १२ मार्च रोजी मतदान व त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी होणार आहे. नंतर या ग्रामपंचायत सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल.
   वाकी ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती पण सोमनाथ पवडमल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती की, दडपशाही करून माझा उमेदवारी अर्ज पळवला त्यांचा अर्ज मान्य करत पुन्हा निवडणुक घेण्याचे आयोगाने सांगितले तर साकत मधील प्रभाग दोन मधील उमेदवार जिजाबाई कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आॅफलाईन व आॅनलाईन बदल झाला होता. त्यांनीही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती त्यामुळे त्याही जागेसाठी पुन्हा निवडणूक होत आहे. १२ मार्च रोजी निवडणूक पार पडेल.
तालुक्यातील वाकी व साकत वगळता ४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे अशी
माहिती तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली
जामखेड तालुक्यात १५ जानेवारी रोजी ४९
ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. अनेक गावात सत्तांतर झाले. काही गावांमधील सत्ताधारी गटानी सत्ता राखली. काही गावात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. राजकीय घोडेबाजार यामुळे गरम झाला. काठावरचे बहुमत असलेल्या अनेक गावांमधील सदस्य गेल्या पंधरा दिवसांपासून सहलीवर आहेत. सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या अनेकांचा आरक्षण सोडतीने हिरमोड केला तर अनेकांना लॉटरी लागली. ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टिमने राबवलेल्या
उपायोजनांमुळे यंदा तालुक्यात राजकीय वादविवाद उफाळून आला नाही. निवडणुका शांततेत  पार पडल्या. आता सरपंचपदाच्या निवडणुकीत
          चौकट
साकत ग्रामपंचायतमध्ये आता पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर व माजी सरपंच हनुमंत पाटील यांच्या गटाकडे सहा सदस्य आहेत तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या गटाकडेही सहा सदस्य आहेत. एका जागेसाठी निवडणूक होत आहे ज्या गटाचा उमेदवार निवडून येईल त्या गटाचा सरपंच होणार आहे त्यामुळे या जागेसाठी दोन्ही गट जोरदार मोर्चेबांधणी करणार हे उघड आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here