जामखेड प्रतिनिधी
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर महागाईचा भडका कमी होईल असे वाटत आसताना गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल कोणत्याही क्षणी शंभरी पार होण्याची शक्यता आहे. हेच का अच्छे दिन म्हणत जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत केंद्र सरकारच्या महागाईचा निषेध व्यक्त केला.
शिवसेना पक्ष प्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने नगर जिल्हा संपर्कप्रमुख संजय घाडी, सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या महागाईचा तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. लवकरात लवकर केंद्र सरकारने महागाई कमी करून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, शहरप्रमुख गणेश काळे, युवा सेना प्रमुख सावता हजारे,
अल्पसंख्यांक प्रमुख नासिर खान, महिला आघाडीच्या प्रमुख मिरा तंटक, गौरी कुचेकर, शंकर कुचेकर, विष्णू मोहळकर, भाऊसाहेब ढवळे, किरण ओझर्डे, किशोर काळे, संग्राम मते, सुरज काळे, बालाजी दळवी, अमोल घाटे, जयदत्त जाधव, शशी खटावकर, संग्राम कर्डिले, आकाश मुळे, अनिकेत इंगळे, दशरथ साळुंखे यांच्या सह अनेक शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.