खळबळजनक बातमी!!! राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

0
226
जामखेड न्युज – – – – 
 राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. मंत्री बच्चु कडू यांच्यावर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा ठपका ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
2014 विधानसभा निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. 2017 मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात अमरावतीतील भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली होती. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांनी त्यावेळी या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते. पण कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या आधी ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी त्यावेळी केला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते, असं स्पष्टीकरण बच्चू कडूंनी 2017 मध्ये केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here