सामाजिक साहाय्य योजना तालुकास्तरीय समितीची दुसरी बैठक संपन्न.

0
239
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – – 
जामखेड तालुक्यातील विशेष  सामाजिक साहाय्य योजनेच्या अनुषंगाने लाभार्थी यांची निवड  करण्यासाठी आज दिनांक १०/२/२०२२ रोजी तालुकास्तरीय  सामाजिक साहाय्य योजना तालुका स्तरीय  समितीची दुसरी बैठक पार पडली होती .  समितीची पहिली बैठक दिनांक २०/१२/२०२१ रोजी पार पडली होती .
       सदर तालुकास्तरीय समिती मध्ये महाराष्ट्र शासन निर्णय २० ऑगस्ट २०१९ नुसार माननीय पालकमंत्री अहमदनगर यांनी शिफारस केलेले आणि माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने नियुक्त झालेले अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश होतो. जामखेड तालुका स्तरीय समिती मध्ये अध्यक्ष म्हणून विद्यमान पंचायत समिती सभापती श्रीमती राजश्री सुर्यकांत मोरे मौजे रत्नापूर, अशासकीय सदस्य म्हणून श्री राजू पाचारे मौजे घोडेगाव, श्री बबन देवकाते मौजे  शिऊर , श्री संतोष निघुडे मौजे अरणगाव तसेच महिला सदस्य म्हणून श्रीमती कांचन अनिल भोरे मौजे देवदैठण यांची निवड केलेली आहे.  सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज दुसरी  बैठक पार पडली . आजच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनांचे ३८ अर्ज तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचे २२  असे एकूण ६०  अर्ज  प्राप्त झाले होते. त्यापैकी ५१ अर्ज  मंजूर करण्यात आले तर ९  अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. जामखेड तालुक्यामध्ये दिनांक १ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत विशेष सामाजिक सह्हाय योजनासाठी विशेष कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी निवडून  पत्र लाभार्थी संखेमध्ये वाढ होणार आहे.
   आजच्या बैठकीमध्ये समाजातील सर्व पात्र लाभार्थी यांचे प्रकरण मंजूर करावे तसेच सर्व पात्रलाभार्थी यांना वेळेवर अनुदान वाटप करण्यता यावे, लाभार्थी निवड करण्यासाठी  साठी गावनिहाय कॅम्प पुढील कालावधीमध्ये घेण्यात यावे अशा सूचना अध्यक्ष आणि सदस्य यांनी दिल्या. बैठकीचे आभार नायब तहसीलदार श्री महाले यांनी करून बैठक संपविण्यात आली. सदर बैठकीस श्री कारखिले अव्वल कारकून संजय गांधी योजना, श्री दासरी अव्वल कारकून इंदिरा गांधी यांनी नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here