Saturday, March 7, 2026
Home ताज्या बातम्या गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते जामखेड पोलीस वसाहतीचे उद्या भुमीपुजन

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते जामखेड पोलीस वसाहतीचे उद्या भुमीपुजन

0
328

जामखेड प्रतिनिधी

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जामखेड पोलीस वसाहतीचे भुमीपुजन उद्या दि. ४ रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता होणार आहे. यामुळे पोलीसांना लवकरात लवकर आपल्या हक्काचा निवारा उपलब्ध होईल.
     जामखेड पोलीस स्टेशनमध्ये सध्या चार अधिकारी व ४८ पोलीस कर्मचारी आहेत. अनेक दिवसांपासून पोलीस वसाहतीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे पोलीस बांधवांना कुटुंबासमवेत बाहेर भाड्याच्या घरात राहावे लागत होते. आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून जामखेड मधील पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावला आहे व त्यांचे भुमीपुजन उद्या दि ४ रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता संपन्न होत आहे.
      जामखेड न्युजशी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, सध्या दोन अधिकारी निवासस्थाने व ३६ पोलीसांसाठी घरे पोलीस वसाहतीत होणार आहेत. लवकरच स्वतंत्र असे खर्डा पोलीस स्टेशन होणार आहे. त्यामुळे तिकडे काही पोलीस वर्ग होतील.
    पोलीस वसाहत झाल्यावर पोलीसांना आपले काम करणे सुलभ होणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी ताबडतोब पोलीस स्टेशनला येता येईल. अनेक वर्षांपासून जनतेचे रक्षक असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जुन्या मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीमध्ये आपल्या परिवारासह जीव मुठीत धरून राहत आहेत. जुनी मोडलेली दरवाजे, मोडलेले अथवा कुजलेले कौलारू त्याला आधार देणारे वाकलेले खांब, परिसरात जप्त केलेला मुद्देमाल, अस्ताव्यस्त पडलेली गुन्ह्यातील वाहने, रात्रीची पुरेशी वीज-व्यवस्था नसल्याने पडलेले काळाकुट्ट अंधाराचे साम्राज्य, वाढलेले गवत आणि काटेरी झुडुपे यामध्येही काही पोलीस बांधव राहत होते.
   आता अद्यावत अशी पोलीस वसाहत होत असल्याने
यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान, बाग, बगिचा यामध्ये असलेल्या जुन्या झाडांचे संवर्धन करणे आणि सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सुख-सुविधा पोलीस वसाहतीत राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!