आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून विशेष सामाजिक साहाय्य योजनेमध्ये लाभार्थी निवडीसाठी विशेष अभियान पात्र लाभार्थी यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा- तहसीलदार योगेश चंद्रे

0
259
जामखेड न्युज – – – – 
    विशेष सहायय योजनेमध्ये येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ,इंदिरा गांधी विधवा,इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय आर्थिक कुटुंब लाभ योजना या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक पात्र लाभार्थी यांना मिळावा त्यापासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये या कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार  रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर  डॉ राजेंद्र भोसले व कर्जत जामखेड चे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 1 ते 11 फेब्रुवारी दरम्यान विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
     वरील अभियान हे जामखेड तालुक्यातील सर्व 87 गावामध्ये राबविण्यात येणार असून त्याबाबत महसूल विभाग,ग्रामविकास विभाग,नगरपालिका विभाग,कृषी विभाग यांच्या अधिकारी आणि ग्रामस्तरीय यंत्रणा यांची  ऑनलाइन बैठक माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी  घेतली आहे.त्यानुसार सर्व विभागांनी या अभियानामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांचे फॉर्म भरून घेणेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
 जामखेड तालुक्यातील सर्व गावातील पात्र लाभार्थी यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. गावपातळीवर लाभार्थी यांनी भरलेले फॉर्म आपले गावचे तलाठी यांच्याकडेस जमा करावे.फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयात दिलेली आहे.त्याप्रमाणे पात्र लाभार्थी यांनी विहित नमुन्यात आणि संपूर्ण कागदपत्र जोडून आपले फॉर्म तलाठी यांच्याकडेस जमा करावे.
   सदर अभियानाचा फायदा हा सर्वसामान्य घटकाला होणार असल्याने जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here