Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या सहा हजार शिक्षकांनी जमा केले टीईटी प्रमाणपत्र; पडताळणीनंतर होणार कारवाई

सहा हजार शिक्षकांनी जमा केले टीईटी प्रमाणपत्र; पडताळणीनंतर होणार कारवाई

0
255
जामखेड न्युज – – – 
 शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार (TET Malpractice) उघडकीस आल्यानंतर बनावट प्रमाणपत्राद्वारे (Bogus Certificate) नोकरी (Job) मिळविणाऱ्या शिक्षकांचा (Teacher) आता शोध घेतला जात आहे. बुधवार (ता.२) पर्यंत राज्यातील सहा हजार शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी (Verification) राज्य परीक्षा परिषदेकडे जमा केले आहे.
        संपूर्ण पडताळणीनंतरच दोषी शिक्षकांवर कारवाई (Crime) करण्यात येणार आहे. राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची गुणपत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत नोकरी मिळविलेल्या बनावट शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. शिक्षण परिषदेने याबाबत जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश दिले आहे.
      परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना दिली आहे. शिक्षकांना परीक्षा परिषदेकडे टीईटीचे मुळ प्रमाणपत्र पाठविणे बंधनकारक आहे, अन्यथा पगार मिळणार नाही, असे परिषदेचे कळविले आहे. जे शिक्षक आपले मूळ प्रमाणपत्र पाठविणार नाही, त्यांचा पगार थांबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!