जामखेड न्युज – – – – –
अकोले प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीत अनेक संसार उद्धवस्त झाले. कोरोनाच्या काळात मोठ्या भावाचे निधन झाले. त्यामुळे विधवा झालेल्या आपल्या वहिनीला आधार देत लहान दिराने विवाह करत समाजाला एक आदर्श संदेश दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात दिराने वहिनी सोबत संसार थाटत सामाजिक आदर्श निर्माण करणारा विवाह नुकताच संपन्न झाला आहे. दरम्यान कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा घरी जाऊन सत्कार केला.
अकोले तालुक्यातील ढोकरी येथील निलेश शेटे यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले. त्यांना ३ वर्षांची एक मुलगीही आहे. घरी तरुण पत्नी पुनम २४ वर्षांची असताना कोरोनाने पतीला हिरावले. त्यामुळे पुनमसमोर जीवनाचा सर्वात मोठा प्रश्न उभा होता. गावातील ज्येष्ठ व्यक्ती माधव तिटमे यांनी पुढाकार घेत लहान दिर समाधान याच्याशी विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांशी चर्चा झाल्यानंतर समाजाची सर्व बंधने झुगारून अखेर दोघांचा विवाह पार पडला. या निर्णयामुळे जीवनातील आनंद गमावलेली पुनमही आनंदी झाल्याचे पाहिला मिळाले.