Monday, September 14, 2026
Home ताज्या बातम्या नागेश्वर यात्रेला नवे स्वरूप, आनंद मेळ्याच्या नियोजनाचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडून...

नागेश्वर यात्रेला नवे स्वरूप, आनंद मेळ्याच्या नियोजनाचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडून कौतुक

0
77

जामखेड न्युज – – – – – 

नागेश्वर यात्रेला नवे स्वरूप, आनंद मेळ्याच्या नियोजनाचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडून कौतुक

जामखेड येथील श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आनंद मेळ्याला सभापती प्रा. राम शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्रा. राम शिंदे यांनी आनंद मेळ्याच्या नियोजनाचे कौतुक करताना, “नगरपरिषदेने अतिशय चांगले नियोजन केले असून, मेळ्यासाठी उपलब्ध करून दिलेली जागा ऐसपैस आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आनंद घेता येणार आहे. अल्प दरात मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा निर्णय नागरिकांच्या हिताचा आहे,” असे सांगितले.

आज सभापती प्रा राम शिंदे यांनी जामखेड मध्ये आल्यावर नागेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेत पाऊस पडू द्या बळीराजा च्या चेहर्‍यावर आनंद खुलू दे असे साकडे घातले यानंतर आनंद मेळा व कुस्ती हगामा यासाठी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

नागेश्वर यात्रेचे स्वरूप गेल्या काही वर्षांत बदलत असून, आता यात्रेला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही जोड मिळत आहे. नागेश्वर सप्ताह, पालखी सोहळा, कुस्ती हगामा तसेच आनंद मेळ्यामुळे यात्रेचा उत्साह वाढला आहे. या विविध उपक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आनंद मेळ्याला नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कुटुंबासह आलेल्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नगरपरिषदेने केलेल्या नियोजनामुळे नागरिकांना सुरक्षित आणि प्रशस्त वातावरणात यात्रेचा आनंद घेता येत आहे.

यावेळी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, रविंद्र सुरवसे, सचिन घुमरे, गौतम उतेकर, अमितभाऊ चिंतामणी, गटनेते तात्याराम पोकळे, सभापती श्रीराम डोके, पवन राळेभात, नगरसेवक विकी घायतडक, मनोज कुलकर्णी, अकुंश शिंदे, नगरसेवक हर्षद काळे, नंदाताई होळकर, प्रविण होळकर, ऋषिकेश मोरे, नगरसेवक संतोष गव्हाळे, नगरसेवक मोहन पवार यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, आयोजक, व्यापारी, नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीनागेश्वर यात्रेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच मनोरंजन, कुस्ती आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल असल्याने यंदाच्या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!