जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 2 फेब्रुवारी पासून  सुरू होणार – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले कोवीड नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना

0
232
जामखेड न्युज – – – – 
को‍विड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने  ठरवून दिलेले नियमानुसार आणि शिक्षण विभागाच्या  मार्गदर्शक तत्वानुसार  जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 12 पर्यतंच्या शाळा व महाविद्यालये सुरु केली जाणार आहेत. अशी माहिती   जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड  लसीचे दोन्ही डोस  घेतलेले असावे तसेच मुलांनी  सुद्धा लसीचा  पहिला डोस घेतलेला असावा या बरोबरच शाळेत येण्यासाठी पालकांचे सहमती पत्र आवश्यक असणार आहे. या अटीवरच शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.  कोरोना रूग्णसंख्या रोखण्यासाठी  आणि लसीकरण प्रमाण वाढविण्यासाठी  प्रशासनातर्फे करण्‍यात आलेल्‍या उपाय योजनांचा आढावा जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दूरदृश्य  प्रणालीद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत  होते.
डॉ. भोसले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या  सभागृहात आज  ही बैठक आयोजित करण्‍यात आली होती.
            या बैठकीला  निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ संदीप सांगळे  महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यलयात उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्‍य अधिकारी दूरदृष्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते.
            बैठकीत जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्‍‍ह्यातील प्रशासकीय यंत्रणा, आरोग्‍य यंत्रणा यांच्या कामकाजा संदर्भात माहिती घेतली. तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात आरोग्ययंत्रणेस  सूचना केल्या.  शासनातर्फे कोविड  प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागू केलेल्या  निर्बंधांचे तालुक्यात तंतोतंत पालन होईल या बाबत दक्षता घ्यावी तसेच 100 टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे . अशा सूचना ही  जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here