कॉन्स्टेबलच्या ११४९ जागांसाठी भरती, १२ वी पास वाल्यांना संधी 

0
240
जामखेड न्युज – – – – 
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वर कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
कॉन्स्टेबल फायरमन भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया आज २९ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ०४ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरती अंतर्गत देशभरात एकूण ११४९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांना CISF कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेतील सर्व आवश्यक माहिती तपासा आणि विहित पात्रतेनुसार अर्ज करा.
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST) आणि दस्तऐवज पडताळणी (DV) या आधारे केली जाईल.
विज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण उमेदवार कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी १८ ते २३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर ३ अंतर्गत रु.२१,७००/- ते रु.६९,१००/- मासिक वेतन मिळेल. उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल, जे आरक्षित उमेदवार असतील त्यांना सूट आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा –
https://www.cisfrectt.in/notifications/Fire21_Notification_English.pdf

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here