सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गो – शाळेत चारा वाटप

0
195
जामखेड प्रतिनिधी
              जामखेड न्युज – – – – 
वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ ( सचिव – पुणे जिल्हा बास्केट बॉल असोशिएसन)  यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त साकत येथिल साकेश्वर गो- शाळे तील जनावरांना मोफत चारा देण्यात आला.
दुग्धोत्पादनातून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचविणार्‍या परंतु तेच दुग्ध उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणार्‍या गोमातांना (भाकड गाई) तसेच लहान वासरांना कत्तलखान्याचा रस्ता दाखविला जातो मात्र या मधुन सुटका करून आणलेल्या जनावरांचे पालन पोषण साकेश्वर येथील गो शाळेत केले जाते. याच गो शाळेत सामाजिक बांधिलकी जपत प्रा सचिन गायवळ यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जणावरांना मोफत चारा वाटप केला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे म्हणाले की, कोरोना काळातही गायवळ बंधूनी कोरोना बाधित रुग्णासाठी औषधे तसेच तालुक्यामध्ये गावा – गावा मध्ये पाण्याचे टँकर चालु करुन लोकसेवा केली आहे असे सांगितले.
 शिवप्रतिष्ठान चे तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले म्हणाले, गायवळ परिवाराने  कोरोना काळात सामाजिक कार्य काय आसते हे दाखवून दिले. तसेच तालुक्यातील सर्वच दानशूर व्यक्तींनी देखील जनावरांना आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून चारा वाटप करून पुंण्याचे काम केले पाहिजे.
याप्रसंगी सभापती सुर्यकांत मोरे, मनसे ता.अध्यक्ष प्रदीप टापरे ,  प्रा. लक्ष्मण ढेपे, शिवप्रतिष्ठण चे पांडूराजे भोसले, प्रहारचे ता. अध्यक्ष जयसिंग उगले,  फिरोज शेख, डॉ. भरत दारकुंडे, भाजपा शहर उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, तुळशीदास गोपाळघरे, अभिजित राळेभात, खंडागळे नाना आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here