जामखेड महाविद्यालयातील प्रा. ऋषिकेश देशमुख सेट परीक्षा उत्तीर्ण

0
286
जामखेड प्रतिनिधी 
                  जामखेड न्युज – – – – 
   दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालय जामखेड येथिल काॅमर्स विभागातील प्राध्यापक ऋषिकेश शशिकांत देशमुख हे प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी सेट परीक्षा 70 टक्के मार्क्स मिळवून प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऋषिकेश देशमुख हे २०२० ला नेट परिक्षा ९९.१६ परसेंटाईल गुण घेवून उत्तीर्ण झाले होते.
         ऋषिकेश देशमुख हे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांचे चिरंजीव आहेत. २०२० पासून ते जामखेड महाविद्यालय जामखेड येथे काॅमर्स विभागात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.
        ऋषिकेश देशमुख यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख, अध्यक्ष उद्धव (बापू)  देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे, संचालक अशोक शिंगवी सह सर्व संचालक तसेच प्राचार्य डॉ. सुनील नरके सह सर्व प्राध्यापक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here