Sunday, March 29, 2026
Home ताज्या बातम्या नगर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला ‘हा’ निर्णय 

नगर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला ‘हा’ निर्णय 

0
296
जामखेड न्युज – – – 
राज्य सरकारने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सध्या तरी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
 आज नगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे चोवीस तासांत २०४५ नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे त्यामुळे सध्या तरी शाळा सुरू करण्याबात निर्णय घेतला नाही कोरोनाची परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी आठ दिवसांत निर्णय घेतील असे सांगितले
जिल्ह्यातील कोणत्याच माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. वाढत्या करोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आठवडाभरात निर्णय घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही प्रशासन करोना संसर्ग कमी होताच शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करेल, असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!