मतदार यादी दोषविरहीत आणि सर्व समाज घटकांना सामावून घेणारी करण्यावर भर – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले – जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३५ लाख ५७ हजार २६६ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचा नाशिक विभागातील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून गौरव

0
311
जामखेड न्युज – – – 
 जिल्ह्यातील निवडणूक शाखेतील विविध घटकांनी केलेल्या निरंतर जनजागृती व  कामामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 35 लाख 57 हजारांच्या पूढे गेली आहे. जिल्हयाची मतदार यादी अधिक दोषविरहीत आणि सर्व समाज घटकांना सामावून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.
            अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी 2022 निमित्ताने मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हातधिकारी कार्यालयातील राजस्वि सभागृहात करण्यात आले होते. योवळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर थोडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी मूख्यल राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने औरंगाबाद येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यवस्तरीय कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना नाशिक विभागातील  उत्कृष्ट जिल्हा निवडणूक जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
            यावेळी मतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. भोसले म्हणाले, 2021 या वर्षभराच्या कालावधीत आपल्या अहमदनगर जिल्हयात मतदार यादीच्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम आणि  नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाही अशा 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांची नाव नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात आली. यासाठी  18 वर्ष वय पूर्ण झालेले कॉलेज युवक, युवती, महिला, अपंग आणि तृतीयपंथी यांचेसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच ग्रामसभांचे देखील आयोजन करण्यात आलेले होते. जिल्हयातील सर्व 7 मतदार नोंदणी अधिकारी, 14 सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि 3722 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
            त्यांच्याच प्रयत्नाने आज रोजी जिल्हयातील मतदारांची एकूण संख्या ही 35 लाख 57 हजार, 266 इतकी झालेली आहे. यातील महिला मतदारांची संख्या 17 लाख 6 हजार 127  इतकी असून पुरुष मतदारांची संख्या 18 लाख 50 हजार 954 इतकी आहे. आपल्या या मतदारांमध्ये 16727 इतके दिव्यांग मतदार असून 185 तृतीयपंथी मतदार आहेत. विशेष मोहिमेच्या कालावधीत जिल्हयातील मतदारांमध्ये 28 हजार 724 इतक्या नवमतदारांची भर पडलेली आहे. अशी माहिती ही श्री.भोसले यांनी यावेळी दिली.
                        राष्ट्रीय मतदार दिनाचे ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूक’ या घोषवाक्य आहे. यानुसार अहमदनगर जिल्हयातील निवडणूक शाखांचे काम अव्याहतपणे चालू आहे. यापुढे जिल्हयाची मतदार यादी अधिक दोषविरहीत आणि सर्व समाज घटकांना सामावून घेणारी असेल. अशी भावना ही श्री.भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
            यावेळी बाबा अहमद शेख, जयेश देवकर, शिवानी दारूणकर, राणी बारस्कर या दिव्यांग, महिला, नवमतदार यांना प्रातिनिधीक स्वदरुपात  मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर चे प्रांताधिकारी अनिल पवार यांना उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी, राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांना उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी, कर्जत चे नायब तहसीलदार पी.डी.मोरे यांना उत्कृष्ट निवडणूक नायब तहसीलदार आणि श्रीरामपूर चे उपशिक्षक सागर माळी यास उत्कृष्ट मतदान केंद्रीयस्तरीय अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. मतदान जागृती विषयक निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी दिशा बढे व विशाल प्रकाश तसेच चित्रकला स्पर्धेतील प्रथम पुरस्कार्थी समर्थ दाभाडे व करिश्मा थोरात यांना ही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित नवमतदारांना जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली.
            जिल्ह्यात मतदार जनजागृती विषयक उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. अमोल बागुल यांना तर उत्कृष्ट  वार्तांकनाबद्दल पत्रकार महेश देशपांडे यांचा जिल्हासधिकारी डॉ. भोसले यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मातन केला. या कार्यक्रमास सर्व तालुक्यातील मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here