जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
जामखेड पोलीसांनी गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तीन दिवसात चार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्याची जामखेड पोलीसांनी हॅटट्रिक केली आहे. यामुळे जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
दि. २३ रोजी केज तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले होते. दि. २४ रोजी ओरीसा राज्यातील सुलेपट येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद केले आणी आज बीड येथील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे त्यामुळे जामखेड पोलीसांनी खुन्याला गुन्ह्यातील आरोपी पकडण्याची हॅटट्रिक केली आहे.
दिनांक 24/1/2022 रोजी दुपारी 14/30 वा.सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,किरकोळ कारणावरून हॉटेलमधील बील देण्याच्या कारणावरून बीड येथे खुन करणा-या गुन्ह्यातील संशयित आरोपी जामखेड शहरातील मिलिंदनगर येथे आले आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ गुन्हे शोध पथकातील अधिकारी/अंमलदार यांना सदर ठिकाणी पाठवुन खात्री केली असता सदर ठिकाणी दोन संशयीत इसम मिळुन आले त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1)आदेश भगवान जोगदंड वय २० वर्षे रा.जायकवाडी काँलनी, नगर रोड, बीड ,२) प्रथमेश तुकाराम घुले वय २२ वर्षे,रा. अंकुश नगर, नगर रोड, बीड ,असे असल्याचे सांगितले.त्यांना जामखेड पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांच्याकडे कसून सखोल विचारपूस केली असता त्यांनी किशोर नंदलाल गुरखूदे रा.जव्हेरी गल्ली ,बीड यास लोखंडी रॉडने मारहान केल्याचे सांगितले त्यानंतर तो उपचार घेत असताना मयत झाला होता.आम्हीच सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्हयाबाबत खात्री केली असता शिवाजी नगर,बीड पोलीस ठाणे येथे गु र नं- 36/2022 भादवी कलम 302,307 ,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यास ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोउपनिरी.पाथरकर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोकॉ.संग्राम जाधव, पोकॉ.संदिप राऊत, पोकॉ.विजय कोळी ,पोकॉ.आबा आवारे ,पोकॉ. अरूण पवार ,पोकॉ.संदिप आजबे ,पोकॉ.सचिन देवढे यांनी केली आहे .