जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
ओरीसा राज्यातील सुलेपट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील २०१८ पासून फरार आरोपी जामखेड पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाकडुन जेरबंद करण्यात यश आले आहे. जामखेड पोलीसांनी कालच बीड जिल्ह्य़ातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले होते व आज ओरीसा राज्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे. जामखेड पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
ओरीसा राज्यातील सुलेपट पोलीस स्टेशन गु.र.नं. 165/2018 भादवि कलम 302 प्रमाणे दाखल झालेल्या गुन्हयातील फरार असलेला आरोपी शोधण्याची मोहिम मा.उपविभागीय पोलीस अधिकारी विरय्या हिरामत, पोसई.चेतन ,पोलीस हवालदार नागेंद्र तलवार सुलेपट पोलीस स्टेशन राज्य् ओरीसा हे करीत होते.पंरतु त्यांना यश येत नव्हते त्यांना या गुन्हयातील फरारी आरोपी पारस छगन काळे जामखेड, जि.अहमदनगर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या मिळालेल्या माहितीवरून मा.उपविभागीय पोलीस अधिकारी विरय्या हिरामत यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना या गुन्हयातील आरोपीबाबत माहिती दिली.दिलेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक जामखेड यांनी लगेच गुन्हे शोध पथकाला माहिती देवुन आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.
गुन्हे शोध पथकाने दिनांक 23/01/2022 रोजी पहाटे 05/00 वा.सुमारास सापळा रचुन संशयीत आरोपी नामे पारस छगन काळे यास आरोळे वस्ती ,जामखेड ता.जामखेड येथे त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले.आरोपी ताब्यात घेतल्यानंतर सुलेपट पोलीस स्टेशन (राज्य् ओरीसा) चे मा.उपविभागीय पोलीस अधिकारी विरय्या हिरामत सो. ,पोसई.चेतन ,पोलीस हवालदार नागेंद्र तलवार यांचे ताब्यात आरोपीस देण्यात आले.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली सुलेपट पोलीस स्टेशन (राज्य् ओरीसा) चे मा.उपविभागीय पोलीस अधिकारी विरय्या हिरामत, पोसई.चेतन , पोलीस हवालदार नागेंद्र तलवार, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल संग्राम जाधव, संदिप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरूण पवार, संदिप आजबे, सचिन देवढे, बाळु खाडे यांनी केली आहे .