जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त
शिवसेनेचे युवा कार्यकर्ते चंदन अंधारे यांची उपशहरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांच्याहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या हेतूने शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना संपर्कमत्री नामदार दादाजी भुसे, संपर्क प्रमुख मा. संजय घाडी सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे
यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे काम सुरु आहे.
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना चंदन अंधारे म्हणाले की, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद व शहरप्रमुख गणेश काळे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेल आणि शिवसेना वाढवण्यासाठी जोमाने काम करेल. आतापर्यंत गोरगरीब वंचीत घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला यापुढे माझे समाजकार्य सुरूच राहील शिवसेनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणार असेही त्यांनी सांगितले.





