बीड जिल्ह्यातील केज येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जामखेड गुन्हे शोध पथकाकडुन जेरबंद

0
296

 

जामखेड न्युज – – – 
   बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील हांगेवाडी येथे दारूसाठी व गांजा साठी पैसे दे म्हणून भांडण करून
गळ्याभोवती दोरी आवळून दगडाने ठेचून खुन करून आरोपी फरार होता तो जामखेड गुन्हे शोध पथकाकडुन जेरबंद करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे यामुळे जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
      दिनांक 22/01/2022 रोजी संध्याकाळी 06/00 के 07/00 वा.चे सुमारास फिर्यादी नामे गोवर्धन सरदार काळे वय 70 वर्षे रा.चांदणी ता.जि.बीड यांची बहिण नामे सखुबाई बन्सी शिंदे रा. हांगेवाडी, पोस्ट रामेश्वर ता.केज, जि.बीड हिला आरोपी नामे राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे
रा.हांगेवाडी, पोस्ट रामेश्वर ता.केज, जि.बीड याने दारु पिण्यासाठी व गांज्यासाठी पैसे दे असे म्हणुन भांडण करून तिच्या गळ्याभोवती दोरी आवळून तोंडावर नाकावर व हनुवटीवर मोठ्या दगडाने ठेचून जीवे मारले म्हणुन फिर्यादी नामे गोवर्धन सरदार काळे वय 70 वर्षे रा.चांदणी
ता.जि.बीड यांनी केज पोलीस स्टेशन जि.बीड येथे तक्रार दिल्याने केज पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 16/2022 भादवि कलम 302,323 प्रमाणे दि.२२/०१/२०२२ रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे रा.हांगेवाडी, पोस्ट रामेश्वर
ता.केज, जि.बीड हा गुन्हा घडलेपासून फरार होवून जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परीसरात राहत होता. जामखेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास तो आज दिनांक 23/01/2022 रोजीचे 15/00 वा.चे सुमारास संशायास्पद रित्या वावरताना मिळून आल्याने
त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने वरीलप्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून केज पोलीस स्टेशन येथील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब ,यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी
गायकवाड , पो.उप.नि.राजु थोरात ,पोना.अविनाश ढेरे, पोकॉ.संग्राम जाधव ,पोकॉ.संदिप राऊत पोकॉ.विजय कोळी, पोकॉ.आबा आवारे, पोकॉ.अरूण पवार, पो कॉ. संदिप आजबे, पोकॉ.सचिन देवढे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here