Saturday, January 31, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड पंचायत समितीच्या भोंगळ कारभारात सुधारणा करा भाजपाचे तुषार बोथरा यांची मागणी

जामखेड पंचायत समितीच्या भोंगळ कारभारात सुधारणा करा भाजपाचे तुषार बोथरा यांची मागणी

0
790

जामखेड न्युज——

जामखेड पंचायत समितीच्या भोंगळ कारभारात सुधारणा करा भाजपाचे तुषार बोथरा यांची मागणी

जामखेड पंचायत समितीत मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरु असून पंचायत समितीला सक्षम अधिकारी नाही यामुळे यामुळे अनेक गैरव्यवहार सुरू आहेत या होत असलेल्या गैरव्यहाराची तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य तुषार बोथरा यांनी केली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, जामखेड पंचायत समिती येथे भोंगळ कारभार चालू असून सर्व सामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत आहे. पंचायत समिती येथील कोणतेही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही.

येथे येणाऱ्या सामान्य लोकांकडे अधिकाऱ्यांकडून चहा पाण्याच्या नावाखाली लाच मागितली जाते वरील सर्व बाबीची तातडीने चौकशी करून बोथरा यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्याकडे केली आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी कारवाई करण्याची मागणी भाजपचे तुषार बोथरा यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील याना निवेदना व्दारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!