जामखेड महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कर्तुत्ववान पुत्राला घडविणाऱ्या दोन मातांचा सन्मान सभापती प्रा राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे तर गुगळे यांच्या मातोश्री सदाबाई गुगळे यांचा सन्मान

0
402

जामखेड न्युज——

जामखेड महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कर्तुत्ववान पुत्राला घडविणाऱ्या दोन मातांचा सन्मान

सभापती प्रा राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे तर गुगळे यांच्या मातोश्री सदाबाई गुगळे यांचा सन्मान

जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबीर, नाट्य स्पर्धा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान याच बरोबर आदर्श पुत्राला घडविणाऱ्या आदर्श मातांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये विधानपरिषद सभापती पदापर्यंत पोहोचलेले प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शंकर शिंदे तसेच कापड व टिश्यू
कल्चर केळी उद्योगात राज्यात अग्रेसर असणारे रमेश गुगळे, दिलीप गुगळे, संजय गुगळे यांच्या मातोश्री सदाबाई हरकचंद गुगळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही आदर्श मातांनी आपल्या मुलांना चांगले संस्कारामुळे या मुलांचा राज्यात नावलौकिक मिळवला आहे.

आरोग्य बिघडून टाकणाऱ्या मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात शरीर कमावून देणारे मर्दानी खेळ जसे दुर्लक्षित होते गेले. तसेच युध्दकला आणि शस्त्रांशी असलेले नातेही पुसट होत गेले. हेच नाते घट्ट कऱण्यासाठी जामखेड येथे महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, माता भगिनी यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच महिला शिवजन्मोत्सव समिती रोहिणीताई संजय काशिद यांनी स्थापन करून गेल्या तेरा वर्षापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षीही तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

१६ मार्च रोजी सकाळी आठ वाजता रक्तदान शिबीर सायंकाळी सात वाजता तालुकास्तरीय सांस्कृतिक नाट्यछटा स्पर्धा
१७ मार्च रोजी दुपारी तीन वाजता भव्य महिला रँली छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड बीड रोड, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, लक्ष्मीआई चौक सायंकाळी सात वाजता शिवरायांनी महाआरती, सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा. शिवजन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद
१८ मार्च रोजी भव्य शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत भव्य मिरवणूकीत ऐतिहासिक, पारंपरिक वेशभूषा असणाऱ्या तीन महिलांना लकी ड्राँ मार्फत तीन आकर्षक भेट वस्तू मिळतील स्थळ लक्ष्मीआई चौक संविधान चौक जामखेड


जगदंबा प्रतिष्ठान, राजमुद्रा युवा मंच जामखेड तसेच संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी काशिद या गेल्या तेरा वर्षापासून सर्व महिलांना घेऊन अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करतात. यात रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच परिसरातील विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, महिलांची भव्य दिव्य मिरवणूक अशा पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यात परिसरातील सामान्यातून असामान्य कर्तृत्व निर्माण करणाऱ्या मान्यवर यांना जामखेड भूषण व जामखेड गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.

महिला शिवजन्मोत्सव समिती आयोजित, शिवजन्मोत्सव सोहळा 2025. आदर्श माता गौरव” पुरस्काराचे निमंत्रण महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे त्यांच्या मातोश्री आदरणीय भामाबाई शंकर शिंदे यांना देताना जगदंब प्रतिष्ठाण चे संस्थापक श्री. संजय (काका) काशिद समवेत भाजपा नेते पांडुरंग उबाळे, सुनीलजी यादव, शंभूसूर्य मर्दानी खेळ आखाडयाचे संस्थापक बबलू टेकाळे व केशवराज कोल्हे उपस्थित होते तर

सन 2025 चा आदर्श माता गौरव”पुरस्काराचे निमंत्रण उद्योग,कृषी,बँकिंग व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या श्री. रमेश गुगळे, श्री.दिलीप गुगळे व श्री.संजय गुगळे या तीन सुपुत्रांच्या मातोश्री आदरणीय सदाबाई हरकचंद गुगळे यांना देताना शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य तथा जगदंब प्रतिष्ठाण चे संस्थापक श्री. संजय (काका) काशिद, केशवराज कोल्हे, धनराज पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here