जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातसह तालुक्यातील विविध ठिकाणी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आली स्वर्गीय हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
तसेच निवारा बालगृहातील अनाथ, वंचित मुलांना सुरूची भोजन देण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसेच तालुक्यातील खर्डा, जवळके, नान्नज, पाटोदा, जवळा या सह अनेक ठिकाणी प्रतिमा पुजन करून अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या हेतूने शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना संपर्कमत्री नामदार दादाजी भुसे, संपर्क प्रमुख मा. संजय घाडी सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे काम सुरु आहे
शिवसेनेने नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणास प्राधान्य दिले आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद,
उपतालुकाप्रमुख गणेश उगले युवा सेना प्रमुख सावता हजारे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रासकर, बावीचे सरपंच निलेश पवार, शहर प्रमुख गणेश काळे, उपप्रमुख अवि बेलेकर, जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गुंदेचा, अल्पसंख्याक उपप्रमुख रफिकभाई शेख, चंदन अंधारे, भारत पवार, विष्णु मोहळकर, जीवन हजारे, किशोर मोहिते, पिंटू शेठ रसाळ यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.



