नारी शक्‍ती पुरस्‍कारासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करावे

0
223
जामखेड न्युज – – – – 
 केंद्र शासनामार्फत दरवर्षी 8 मार्च आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाचे औचित्‍य साधुन नारी शक्‍ती पुरस्‍कार प्रदान केले जातात. राष्‍ट्रासाठी उत्‍कृष्‍ट कामगिरी करणा-या महिला / संस्‍था तसेच समाजासाठी केलेल्‍या योगदानाची दखल घेऊन अशा महिला / संस्‍था यांना हा पुरस्‍कार प्रदान केला जातो. महिला / स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या कार्याचा गौरव व्‍हावा या उद्देशाने अहमदनगर जिल्‍ह्यातील नारी शक्‍ती पुरस्‍कारासाठी योग्‍य त्‍या कागदपत्रासह केवळ ऑनलाईन पध्‍दतीने केंद्रशासनाचे www.awards.gov.in या वेबसाईटवर 31 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत केवळ ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील.
                          Advertisement
            अधिक माहितीसाठी जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 1 मजला, अर्पित हाऊस, श्री संजय जव्‍हेरी यांची इमारत, सर्जेपुरा, अहमदनगर दुरध्‍वनी क्र. 0241-2431171 यांच्‍या संपर्क साधावा असे आवाहन बी.बी. वारुडकर, जिल्‍हा महिला व बालविकास अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिध्‍दी प‍त्रकान्‍वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here