नाना पटोलेंची जीभ छाटा आणि तब्बल ‘इतके’ लाख बक्षीस मिळवा’, भाजप नेते सुजित जोगस यांची उघड धमकी

0
186
जामखेड न्युज – – – 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  ‘मी मोदीना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’ असं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्यामुळे  भाजप आक्रमक झाली आहे. बीजेपी कार्यकर्त्यांनी आज दिवसभरात राज्यात आंदोलन देखील केली आहेत. पण आता मुद्याची लढाई गुद्यावर आली आहे. कारण ‘नाना पटोलेंची जीभ छाटा 1 लाख मिळवा’ अशी घोषणाच जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. त्यामुळे आत  काँग्रेसही आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात जालना भाजप युमो चांगलीच आक्रमक झाली. जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी तर चक्क नाना पटोलेंची जीभ छाटून आणा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा, अशी वादग्रस्त स्कीम जाहीर केली आहे. जोगस यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार देखील दिली आहे.
                        ADVERTISEMENT
दरम्यान, नाना पटोले यांचा पंजा छाटणार अशी भाषा करणाऱ्या अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दिलीप ऐडतकर यांनी केली आहे.  ‘नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेवावा, असे वक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केलं होतं.
बोंडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अनिल बोंडे यांनी पाठवलेली पोर कुठपर्यंत आहे त्यांचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे त्यापूर्वी अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते दिलीप ऐडतकर यांनी केली.
त्यांना जर अटक झाली नाही आणि नाना पटोले यांना जर काही धोका झाला तर येथील पोलीस त्यांला जबाबदार असतील, नाना पटोले यांनी फक्त मोदींचा उल्लेख केला आहे त्यांनी नरेंद्र मोदी असा उल्लेख कुठेही केलेला नाही त्यामुळे भाजपने हे स्वतःच्या अंगावर घेवू नये, पोलिसांनी तात्काळ अनिल बोंडे यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसकडून अमरावती येथे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here