आमदार रोहित पवारांमुळे पर्यटन विकासाचा चालना श्रीक्षेत्र सिताराम गड व गीतेबाबा देवस्थानास “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

0
219
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – – 
     जामखेड तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या खर्डा येथील श्रीक्षेत्र सिताराम गड व श्री क्षेत्र संत गीते बाबा देवस्थानास नुकत्याच ‘ ब ‘ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. आ. रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे . त्यामुळे भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
   
श्रीसंत भगवान बाबांचे गुरू असलेले संत श्री गीते बाबा यांचे समाधी स्थळ जामखेड तालुक्यातील खर्डा  या ठिकाणी आहे. या ठिकाणी संत श्री भगवान बाबा यांना मानणारा भक्तांचा मोठा समुदाय आहे. या भक्तांसह इतरही भाविक खर्डा येथील स्थित संत श्री गिते बाबा व श्री संत सिताराम बाबा यांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी खर्डा येथे येत असतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान व निवडणुकीनंतरही खर्डा येथे आ. रोहित पवार व सामान्य जनतेच्या सहकार्यातून गिते बाबा मंदिराच्या विकासाचे काम सुरू होते. या दरम्यान लोकांची भावना होती की, या समाधी स्थळाला ‘ ब ‘ दर्जा मिळावा.
 ही भावना समजून घेत आ. रोहित पवार यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. या ठिकाणाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी- सुविधांचा विकास न झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. भक्ती स्थळाचे पावित्र्य राखणे देखील शक्य होत नव्हते. संत श्री भगवानबाबांची पालखी खर्डा येथे मुक्कामी आल्यानंतर त्यांच्या आश्रयाची होत असलेली गैरसोय पाहून आ. रोहित पवार यांना वाईट वाटले आणि हीच गोष्ट त्यांनी हेरली. या दोन्ही महान संतांच्या तीर्थक्षेत्राला ‘ ब ‘ वर्ग दर्जा मिळावा, याकरीता जिल्हा प्रशासन व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
                         ADVERTISEMENT
याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी ‘ ब ‘ वर्ग दर्जाची मान्यता मिळाली असून या माध्यमातून याठिकाणी अनेक विकास कामे करता येणार आहेत. या विकास कामांच्या माध्यमातून येथे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून त्यांना या ठिकाणी विविध सोयी – सुविधा उपलब्ध देता येणार आहेत. ‘ ब ‘ वर्ग दर्जा मिळाल्याने या दोन्ही तीर्थक्षेत्रांचं पावित्र्य राखण्यास देखील मदत होणार आहे.
चौकट…
 खर्डा येथे वाढत्या पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल . खड्यापर्यंत आलेल्या पालखी मार्गाला खर्डा ते पंढरपूर नेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री | नितीन गडकरी यांची तीन वेळा भेट घेतली आहे . या प्रयत्नांना ही लवकरच यश मिळेल.
 आ. रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here