जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
याहिया पठाण यांची महाराष्ट्र शाॅटी व्हाॅलीबाॅल संघाच्या उपकर्णधार पदी निवड झाल्याबद्दल जामखेड मध्ये विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय,
पंचायत समितीचे सभापती व उपसभापती, सावळेश्वर उद्योग समूह, कोठारी प्रतिष्ठान जामखेड पोलिस स्टेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने तसेच जामखेड पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ADVERTISEMENT 

तहसिल कार्यालयात तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, दुय्यम निबंधक मनोज पाटेकर, कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, उपसभापती रवी सुरवसे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, संजय वराट जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी आपापल्या कार्यालयात सत्कार केला.
जामखेड पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेशजी मोरे, हर्षल डोके, सुदाम वराट, अशोक वीर, यासिन शेख, धनराज पवार, संजय वारभोग पप्पू सय्यद, राजू म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते नासिर चाचू, रोहित राजगुरू, जाकीर शेख, समीर शेख, संतोष गर्जे, नाजीम पठाण, जुबेर पठाण, तोफीक शेख, अरबाज सय्यद, कृष्णा बुरांडे याच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वानीच याहिया याने आता आपल्या देशाचे नेतृत्व करावे अशा शुभेच्छा दिल्या.
कालही नगर येथे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, लोकमत कार्यालयात व लोकसत्ता संघर्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला होता.