Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड महाविद्यालय जामखेडच्या प्र. प्राचार्यपदी प्रा. सुनिल नरके यांची निवड झाल्याबद्दल संजय...

जामखेड महाविद्यालय जामखेडच्या प्र. प्राचार्यपदी प्रा. सुनिल नरके यांची निवड झाल्याबद्दल संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

0
290
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
   दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालय जामखेड येथिल प्र. प्राचार्य पदी जामखेड महाविद्यालयातील प्रा. सुनिल नरके यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, सुदाम वराट, जोगेश्वरी मिसळ सेंटरचे संचालक गणेश मुरुमकर, नारायण राळेभात, गणेश डोके, संजय (नाना) बेलेकर, विजय काशिद, ओंकार राऊत, दिपक सुरसे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ADVERTISEMENT 

 

      प्रा. सुनिल नरके हे गेल्या तीस वर्षापासून भूगोल विषयाचे जामखेड महाविद्यालय जामखेड येथे अधयापन करत आहेत. तसेच संशोधक मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची त्यांना मान्यता आहे. तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यांचे भूगोल विषयाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 25 पुस्तके क्रमिक अभ्यासक्रमात आहेत.
   विद्यार्थी वर्गात एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून आजपर्यंत त्यांची ख्याती आहे. त्यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!