राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद

0
205
जामखेड न्युज – – – 
वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा,१५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाला हे निर्देश दिले आहेत. याआधी ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण वाढती रुग्णसंख्या पाहता आता १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. शाळेसोबतच कॉलेज आणि कोचिंग क्लासेससाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी ऑनलाइन वर्ग मात्र सुरु राहणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याआधी मुंबई, पुणे, नागपूर अशा प्रमुख शहरांमधील शाळा करोना रुग्णसंख्येमुळे बंद होत्या. करोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या ठिकाणी शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आता राज्य सरकारच्या निर्णयानंतर सरसकट सर्व जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पाहता या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे.
                      ADVERTISEMENT
 
आठवडाभर महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. महाराष्ट्राचा कोरोना रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार गेलाय तर एकट्या मुंबईने २० हजारांचा आकडा क्रॉस केलाय. राज्य सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. तर सकाळी ५ ते रात्री ११ जमावबंदी लागू असेल. या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here