जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जिल्हा परिषद झिक्री शाळेला सरपंच व काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापिका मनमानी कारभार करतात सरपंच, ग्रामस्थ व पालकांना विश्वासात घेत नाहीत. त्यांची बदली करावी म्हणून 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिवशीच सरपंच नंदा साळुंके व काही नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकले होते. ही चावी आंदोलनकर्त्यांकडे आसावयास हवी होती पण या कुलपाची चावी केंद्रप्रमुख व शिक्षकाकडे कशी असा प्रश्न युवा कार्यकर्ते ऋषिकेश साळुंके यांनी उपस्थित केला आहे व एक शिक्षिका व केंद्रप्रमुख यांचीच आंदोलन घडवून आणले व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची लेखी कल्पनाही दिली नाही यामुळेच संबंधित शिक्षिका व केंद्रप्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
जिल्हा परिषद झिक्री शाळा निर्लेखनाची प्रक्रिया पुर्णपणे वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका यांनी पार पाडली होती निर्लेखन शाळा तपासणी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी नेमलेल्या समितीने करत अहवाल सादर केलेला आहे यास गटविकास अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. आणी आता पुन्हा आंदोलनकर्त्यांच्या दबावामुळे पुन्हा चौकशी करण्याचे कारण काय ❔ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT 

आंदोलनकर्त्यांनी कुलुप लावले त्यावेळी शिक्षिका व केंद्रप्रमुख यांनी शाळेचे कुलुप काढले व मग आंदोलनकर्त्यांनी त्यांचे कुलुप लावले. तसे पाहता शाळेला दोन कुलपे लावली पाहिजे होती. आंदोलनकर्त्यांनी लावलेल्या कुलपाची चावी शिक्षिका व केंद्रप्रमुख यांच्या कडे आंदोलनकर्त्यांनी का दिली तसेच कुलुप लावल्याची खबर पंचायत समिती कार्यालयात का दिली नाही. म्हणजे हे आंदोलन शिक्षिका व केंद्रप्रमुख यानीच घडवून आणले होते.
याचबरोबर केंद्रप्रमुख यांचे गावात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार आहेत अशीही गावात सगळीकडे चर्चा आहे असेही साळुंके यांनी सांगितले.
आठ दिवसांपासून झिक्री शाळा आंदोलनामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. झिक्री शाळेच्या मुख्याध्यापिका मनमानी कारभार करतात सरपंच व ग्रामस्थ, पालकांना विश्वासात घेत नाहीत. त्यांची बदली करावी म्हणून 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिवशीच सरपंच नंदा साळुंके व काही नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकले होते. दि. ६ रोजी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी झिक्री येथे भेट देत आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा केली होती व आंदोलन मिटवले होते. यावेळी कुलुप उघडण्यासाठी शिक्षिकेकडे चावी कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच वरिष्ठांना कुलुप ठोकल्याची खबर का दिली नाही याचबरोबर दुसर्यांदा निर्लेखन कशासाठी असे अनेक प्रश्न साळुंके यांनी उपस्थित केले आहेत यात दोषी असणारी शिक्षिका व केंद्रप्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.