जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले यावेळी गावातील पत्रकार बाळासाहेब वराट, सुदाम वराट यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थी व पालक व प्रतिष्ठित नागरिक हजर होते.
ADVERTISEMENT 

लसीकरणाचे उद्घाटनप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, सरपंच हनुमंत पाटील, पोलीस पाटील महादेव वराट, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट सर, ग्रामपंचायत सदस्य राजू वराट, ज्ञानदेव मुरुमकर दादासाहेब वराट, सेवा संस्थेचे संचालक गणेश वराट, सैनिक भरत वराट, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, जाहेद बागवान, सुलभा लवुळ, विजयकुमार हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर याच्यासह आरोग्य विभागातील डॉ. प्रशांत पाखरे समुदाय आरोग्य अधिकारी, लहू जेधे आरोग्य सेवक, शिंदे एम. आर. आरोग्य सेविका, मनिषा वराट, मनिषा सानप, छाया वराट, ज्योती लहाने सर्व आशा सेविका हजर होते.
ADVERTISEMENT 

यावेळी गावातील पत्रकार बाळासाहेब वराट व सुदाम वराट यांचा आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्याना लसीकरणाचे महत्त्व सांगितले दहावीचे ४८ विद्यार्थी व नववीचे ३७ विद्यार्थ्यांना
शासकीय नियमानुसार कोव्याक्सिनचे लसीकरण करण्यात आले.