जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जामखेडकरांच्या सेवेसाठी केसनंदची अस्सल गावरान मिसळ जोगेश्वरी मिसळ व भेळ सेंटरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यासाठी जामखेड, कर्जत, आष्टी, पाटोदा येथील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आज दि.०४ जानेवारी रोजी शिवशंकर मुर्ती समोर , नगररोड जामखेड येथे जोगेश्वरी मिसळ या भव्य दालनाचे उद्घाटन डॉ. भगवान मुरुमकर (माजी सभापती- तथा विद्यमान सदस्य, पंचायत समिती जामखेड), केदार रसाळ ( संचालक – हॉटेल किनारा), मोहन काकडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
सुप्रसिद्ध अशी जोगेश्वरी मिसळ महाराष्ट्रभर अनेक शाखा असलेली चविष्ट मिसळ श्री. सचिन हरगुडे व नितीन हरगुडे यांच्या मार्गदशना खाली जामखेड शहरात सुरु करण्यात आली आहे. या उद्घाटनप्रसंगी सर्वच राजकीय पक्षांचे मान्यवर व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी माजी प्राचार्य श्रीराम मुरुमकर, भाजपाचे युवा नेते सागर धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, कर्जतचे जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, माजी पंचायत समितीचे सदस्य मनोज राजगुरू, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले, काॅग्रेसचे शहाजीराजे भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, पोपट राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर, तात्याराम पोकळे, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, भरत काकडे, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, धामणगावचे सरपंच महारुद्र महानवर, पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे, राजुरीचे सरपंच गणेश कोल्हे, नाना गिते, रत्नापूरचे सरपंच दादासाहेब वारे, डॉ. संजय भोरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक बिभिषण धनवडे, दिंगाबर चव्हाण , पवनराजे राळेभात, काॅग्रेसचे राहुल उगले, अँड. प्रविण सानप , काकासाहेब राळेभात, मोहन गडदे, गहिनीनाथ गिते, मच्छिंद्र गिते,शरद शिंदे, बाजीराव गोपाळ घरे, युनुसभाई सय्यद, अनिल यादव , गोरख घनवट, उद्धव हुलगुंडे , जमीर सय्यद , आण्णा ढवळे, प्रविण बोलभट , गणेश वारे , विजय धुमाळ, गणेश डोके, डॉ. एकनाथ मुंडे, डॉ. प्रताप चौरे, डाॅ. काकडे, नारायण राऊत, वाल्मिक कोल्हे, प्रविण चोरडीया, साकतचे माजी सरपंच कांतीलाल वराट, अमोल मुरुमकर,
तेलंगशी सरपंच जाधव, खर्डा सरपंच आसाराम गोपाळघरे, आपटीचे नंदु गोरे, डॉ. अजय वराट, ज्ञानदेव मुरुमकर, आप्पासाहेब मुरुमकर, श्याम मुरुमकर, जायभायवाडीचे सरपंच, जातेगाव सरपंच व उपसरपंच आदी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शासकीय अधिकारी, शेतकरी, पदाधिकारी व ग्रामीण व शहरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जामखेड च्या स्वादात आणखी एक भर ” जोगेश्वरी मिसळ मध्ये मिळणार मटकी भेळ, दही मिसळ, स्पेशल जोगेश्वरी मिसळ, सोलकडी, मसाला ताक , कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, स्पेशल चहा तसेच फॅमिलीसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, प्रशस्त व भव्य मिसळ हाऊस तेव्हा जामखेडकरांनी एक वेळ आस्वाद घेण्यासाठी यावे.
असे आवाहन जोगेश्वरी मिसळ शाखा जामखेडचे संचालक गणेश शेठ मुरुमकर व कल्पेशशेठ दळवी यांनी केले आहे.