जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
२९ वर्षे नवविभागात सेवा करून सेवानिवृत्त झालेले राम बाबासाहेब मुरुमकर यांचा आज श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी सहशिक्षका सुलभा लवुळ यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार बाळासाहेब वराट, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक वराट, जाहेद बागवान, सुलभा लवुळ, विजयकुमार हराळे, आश्रू सरोदे, अतुल दळवी, आण्णा विटकर हजर होते.
यावेळी बोलताना राम मुरुमकर यांनी सांगितले की, मी वनविभागात २९ वर्षे इमाने इतबारे सेवा केली आता पुढेही हरीत गाव करण्यासाठी मी अविरत प्रयत्न करणार आहे. झाडे लावा झाडे जगवा हि संकल्पना प्रत्यक्षात गावात राबविणार आहे.