—-तर महावितरणच्या खर्डा उपकेंद्रास स्वाभिमानी शेतकरी संघटना टाळे ठोकणार

0
332
जामखेड प्रतिनिधी 
     जामखेड न्युज – – – – – (सुदाम वराट) 
 जामखेड तालुक्यातील खर्डा, सातेफळ, वाकी, वंजारवाडी येथील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच गवळवाडी येथील मेन लाईनची तार ५ दिवसात २ वेळेस तुटल्यामुळे या भागातील नागरिकांच्या जीविताला धोका होवू शकतो. यामुळे ती तात्काळ व कायमस्वरूपी दुरूस्त करावी अशा विविध मागण्या दोन दिवसात मान्य न झाल्यास खर्डा येथील वीज मंडळाचे सबस्टेशन (उपकेंद) कुलुप लावून बंद करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे यांनी दिला आहे.
याबाबत महावितरणच्या खर्डा येथील कार्यालय येथील शाखा अभियंता कदम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  खर्डा, सातेफळ, वाकी, वंजारवाडी येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच गवळीवाडी येथील मेन लाईनची तार ५ दिवसांत २ वेळा तुटल्यामुळे येथील शेतकरी जनावरे व लहान मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागात सुरळीत वीजपुरवठा करण्यासोबत तुटलेल्या तारा तात्काळ दुरूस्त कराण्याच्या मागणीसाठी खर्डा येथील शाखा अभियंता कदम यांना देण्यात आले आहे. दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास दोन दिवसानंतर येथील संपूर्ण वीज मंडळाचे सबस्टेशन बंद करून त्यास कुलूप लावून शाखा कार्यालय खर्डा येथे शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असून. शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे महावितरणकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्र यावे व आपला वीज पुरवठा सुरळीत करून घ्यावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे यांनी केले आहे.
  सदर निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांचे समवेत खर्डा ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र काळे, काका जोशी, सुनील बहादुरे, शेतकरी व वीज कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here