शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

0
252
जामखेड न्युज – – – 
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. वर्षा गायकवाड काल (सोमवारी) अधिवेशनात उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड ट्विटमध्ये म्हणाल्या की, “मला आज कळलं की काल संध्याकाळी प्रथम लक्षणं जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी चाचणी सकारात्मक आली आहे. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला वेगळे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांना खबरदारी घेण्याची विनंती करते.”
राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान, वेगानं वाढणारे कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेले के. सी. पाडवी यांच्याही नावाचा समावेश आहे. गेल्या 2 दिवसांत एकूण 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 2 दिवसांत 2 हजार 300 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशातच आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here