जामखेड न्युज – – –
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावर कारवाईची शक्यता असल्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली असून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांना टोला लगावला असून मांजरासारखा आवाज काढणारे आज मांजरासारखे लपून बसलेत असं म्हटलं आहे. ते सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“जे लोक दुसऱ्यांना चिडवत असतात, त्यांच्यावर अशी वेळ ईश्वर कधी ना कधी आणत असतो. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत ही वस्तुस्थिती आहे. ते वाघाला घाबरतात की कोर्टाला हे माहिती नाही, पण घाबरत आहेत ही वस्तुस्थिती आहे,”
“जे गुन्हेगार असतात ते सर्वात जास्त पोलिसांना घाबरतात. प्रत्येक गुन्हेगार कायदा आणि पोलिसांना घाबरत असतो. कोणी गुन्हा केला हे मला माहिती नाही. पण शेवटी दुसऱ्याला चिडवायला जातो आणि म्याव म्याव करत असतो तेव्हा तेच करण्याची परिस्थती दैव आपल्यावर आणतं हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपलं वागणं चांगलं ठेवलं पाहिजे,” असा सल्ला केसरकरांनी यावेळी दिला.
संतोष परब हल्ला प्रकरणावरून नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेनेचा विधीमंडळात आक्रमक पवित्रा
नारायणा राणेंनाही सल्ला
“नारायण राणे केंद्रात आपण मंत्री आहोत म्हणून आपल्या मुलाला वाचवणार अशी भूमिका घेणार असतील तर उत्तर पदेशात काय झालं हे आपण पाहिलं आहे. मंत्र्याच्या मुलाला वाचवताना काय उद्रेक होते हेदेखील लोकांनी पाहिलं आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात आणि शांतताप्रिय सिंधुदुर्गात होऊ नये इतकीच आशा आहे,” असं केसरकर म्हणाले आहेत.