जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण गायकवाड सर यांनी आपला वाढदिवस निवारा बालगृहातील मुलांसोबत साजरा करत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
श्री प्रवीण गायकवाड सर यांच्यामुळे निवारा बालगृह येथील विद्यार्थ्यांसोबत एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटले.अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये उत्साही मुलांमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. तेथील मुलांमधील चैतन्य पाहून मनोमन आनंद झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाप्पू ओव्हाळ यांनी केले. निवारा बालगृह याची संपूर्ण माहिती दिली.येथील वेगवेगळे प्रकल्प व विद्यार्थ्यावरील उपक्रम याचीही माहिती दिली.
प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगतामध्ये तेथील सर्व स्टाफचे प्रथमतः कौतुक करून मुलांसोबत गप्पा करून त्यांना मार्गदर्शन केले. आणि इंग्रजीचे गाढे अभ्यासक माध्यमिक जामखेड तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रवीण गायकवाड सर यांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो.सामाजिक भान ठेवून श्री प्रवीण गायकवाड सर यांनी आपल्या सहकुटुंबा सह निवारागृतील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला व मुलांसाठी जेवण दिले. याबद्दल श्री व सौ गायकवाड सर कुटुंबाचे कौतुक व अभिनंदन केले.
निवाराबालगृहात गेल्यापासून मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या कार्यक्रमासाठी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री राजेशजी मोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये निवारा बालगृहतील सर्व काम पाहणाऱ्या प्रत्येक सदस्याचे मनापासून कौतुक केले, पुढील कार्यास शुभेच्छा देत मदत करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले, श्री अरुण जाधव यांनी सर्व विद्यार्थी कशा पद्धतीने राहतात व विद्यार्थ्यांचा दिनक्रम ज्यांना शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही अशा अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्याबद्दल निवारा गृहात त्यांची व्यवस्थित व्यवस्था केलीआहे असे सांगितले.त्याचबरोबर सर्व शिक्षक वर्ग आल्याने मीही भारावून गेलो आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. व सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.त्याचबरोबर प्राचार्य शांताराम पारखे यांनीही सर्व प्रकल्पाचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग,प्राचार्य शांताराम पारखे, उपप्राचार्य पोपट जरे, माजी उपमुख्याध्यापक दादाहरी ठाकरे, माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव श्री बोलभट सर, प्राध्यापक अश्रुबा फुंदे, प्रा.सादिक शेख, योगशिक्षक बाळासाहेब पारखे, भरत लहाने, कलाशिक्षक राऊत मुकुंद, एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, अशोक राळेभात सर, किशोर कुलकर्णी, अर्जुन रासकर, सुभाष बोराटे, आदित्य देशमुख, अजित सांगळे, अविनाश नवगिरे, साई भोसले, स्वप्नील जाधव, विनोद उगले हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन बापू ओव्हाळ, केसकर सर, चव्हाण सर, शिंदे राजू व सर्व सहकाऱ्यांनी केले आभार प्रदर्शन श्री संजय कदम यांनी केले.





